मुंबई: सरकारने डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानंगी दिली. पण QR कोड घेणं बंधनकारक केले आहे. QR कोडची चौकशी करण्यासाठी “मुंबई डबेवाला असोशिएशन”चे पदाधिकारी आज C.P. कार्यालयात गेले असतां त्यांना तेथून रेल्वे अधिका-यांचा नंबर दिला गेला. रेल्वे अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट सांगितले. डबेवाल्यांना लोकलने प्रवास करू देण्याबाबतचा कोणताही GR आमच्या कडे आलेला नाही. सबब आम्ही तुम्हाला QR कोड देऊ शकत नाही. जेव्हा GR येईल तेव्हा डबेवाल्यांनी QR कोडसाठी अर्ज करा. त्यांनी QR कोड मिळण्याची पध्दत सांगितली, सर्व डबेवाल्यांची संपुर्ण माहिती पेनड्राईव मध्ये भरून कार्यालयात सादर करायला सांगितली. मग ज्या डबेवाल्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, त्यांना त्या मोबाईलवर QR कोड पाठवला जाईल.
मग लोकलने प्रवास करताना तो QR कोडचा वापर करायचा. आता अडचण अशी आहे की, काही डबेवाल्यांकडे मोबाईल नाही तर बहुतांश डबेवाल्यांकडे साधे मोबाईल आहेत. मोजक्याच डबेवाल्यांकडे अँड्रॉइड मोबईल आहेत. त्या मुळे अशिक्षित किंवा अर्धशिक्षित डबेवाल्यांना QR कोड मिळवणे अवघड जाणार आहे. आमची सरकारला विनंती आहे की, डबेवाल्यांकडे स्व:ताचे ओळखपत्र आहे. ते ओळखपत्र प्रमाण मानून त्यांना लोकलने प्रवास करू देण्याची अनुमती द्यावी. अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
सरकारने डबेवाल्यांनाही केला QR कोड घेणं बंधनकारक.
सरकारने डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानंगी दिली. पण QR कोड घेणं बंधनकारक केले आहे.

Loading...