सनरायझर्स हैद्राबादवर मात; मुंबई पुन्हा टॉपवर...!

1 min read

सनरायझर्स हैद्राबादवर मात; मुंबई पुन्हा टॉपवर...!

आयपीएल टी-२० स्पर्धेत आज खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैद्राबादचा ३४ धावांनी पराभव करत यंदा पुन्हा एकदा टॉपचे स्थान पटकावले.

शारजा : आयपीएल टी-२० स्पर्धेत आज खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैद्राबादचा ३४ धावांनी पराभव करत यंदा पुन्हा एकदा टॉपचे स्थान पटकावले.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत मुंबई इंडियन्सने ५ बाद २०८ धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्मा ५ चेंडूत ६ धावा काढून बाद झाला. मात्र, डिकॉकने ३९ चेंडूत प्रत्येकी चार चौकार व षटकारांचा मदतीने ६७ धावा ठोकल्या. सुर्यकुमार २७, ईशान किशन ३१, हार्दिक २८, पोलार्डने १३ चेंडूत नाबाद २५ व कृणालने ४ चेंडूत नाबाद २० धावा तुडवल्या.
विजयाचे २०९ धावांचे आव्हान हैद्राबादला पेलवले नाही. वॉर्नर व बेरीस्टोने सुरुवात झोकात केली. मात्र बोल्टने बेरीस्टोला पंड्याकरवी २५ धावांवर झेलबाद केले. मनीष पांडे १९ चेंडूत ३० धावावर परतला. विल्यम्सन ३, गर्ग ८ , शर्मा १० व समदने २० धावांचे योगदान दिले. वॉर्नरने एकाकी झुंज देत ४४ चेंडूत ६० धावा केल्या. मात्र  १६ व्या षटकात पॅटिन्सनच्या चेंडूवर वॉर्नर चकला व किशनने त्याला टिपले. त्यामुळे हैद्राबादला ७ बाद १७४ पर्यंत मजल मारता आली.
या विजयासोबतच मुंबई ५  सामन्यात ३ विजयासह ६ गुण घेत दुसऱ्यांदा टॉपवर जाऊन पोचला.