तळोजा कारागृहा बाहेर अर्णब समर्थक विरुद्ध मुंबई पोलिस समर्थक सामना

1 min read

तळोजा कारागृहा बाहेर अर्णब समर्थक विरुद्ध मुंबई पोलिस समर्थक सामना

तळोजा कारागृहाच्या परिसरात अर्णव समर्थक आणि मुंबई पोलिसांच्या समर्थकांमध्ये सामना रंगलेले पाहायला मिळाला.

नवी मुंबई: अर्णव गोस्वामी यांनी रविवारी सकाळी अलिबागहून खारघरच्या तळोजा कारागृहात आणण्यात आले. त्यावेळी तळोजा कारागृहाच्या परिसरात अर्णव समर्थक आणि मुंबई पोलिसांच्या समर्थकांमध्ये सामना रंगलेले पाहायला मिळाला. रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी  यांना झालेल्या अटकेवरून आता सामान्य लोकांमध्येही दोन तट पाहायला मिळत आहेत.या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. मात्र, हे प्रकरण मारामारीपर्यंत जाण्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या समर्थकांना पांगवले. तरीही दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरुच राहिली. ‘अर्णव गोस्वामी खोटारडा आहे, महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद’, असे नारे मुंबई पोलिसांच्या समर्थनार्थ जमलेल्या गटाने दिले.