सराईत गुन्हेगाराचा दगड विटाने ठेचून खून.

1 min read

सराईत गुन्हेगाराचा दगड विटाने ठेचून खून.

पत्नीसह सासुनेच केला दगड, विटानी ठेचून खून

विजय कुलकर्णी/परभणी : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका इसमाचा त्याची पत्नी व सासुने दगड व विटानी ठेचून खून केल्याची घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमजम कॉलनीत मंगळवारी (दि.17) उघडकीस आली.
अधिक माहितीनुसार, सराईत गुन्हेगार अलीम काजी याच्यावर मोबाइल चोरीसह हाणामारी, छोट्या मोठ्या चोरीसह अनेक गुन्हे दाखल होते. मागील दोन वर्ष तो परभणी मधून गायब होता, पण दोन-तीन दिवसांपूर्वी परभणीत आला होता. मंगळवारी दारू पिऊन पत्नीसोबत वाद घालू लागला.माझ्यासोबत चल म्हणत गोंधळ घालत होता. मंगळवारी भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले. याच रागातून त्याच्या पत्नीसह सासुने दगड, विटानी ठेचून  त्याला जागीच ठार केले. घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल बहात्तरे हे करीत आहेत.