२५ वर्षीय विवाहितेचा खून

सेलू निपाणी टाकळी रस्त्यावर शेत सर्वे नंबर १०३ मधून गेलेल्या लोअर दुधना च्या कालव्यात हिरव्या रंगाच्या कापडी पोत्यात २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह बांधून फेकण्यात आला.

२५ वर्षीय विवाहितेचा खून

परभणी : तालुक्यातील निपाणी टाकळी परिसरात एका २५ वर्षीय विवाहित महिलेचे प्रेत खून करून लोअर दुधना कालव्यात फेकून दिल्याची घटना आज सकाळी ७ वाजता उघडकीस आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे एका अज्ञात २५ वर्षे महिलेचे प्रेत आज निपाणी टाकळी येथील ग्रामस्थांना सकाळी ७ वाजता आढळून आले. घटनेची माहिती कळताच पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल, पोनि गोवर्धन भूमे, सपोनि सरला गाडेकर, सपोनि माधव लोकुलवार, सापोउपनि सुधाकर चौरे, पोलीस नायक रामेश्वर मुंढे, पोलीस नायक बाळू पूरणवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

सेलू निपाणी टाकळी रस्त्यावर शेत सर्वे नंबर १०३ मधून गेलेल्या लोअर दुधना च्या कालव्यात हिरव्या रंगाच्या कापडी पोत्यात २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह बांधून फेकण्यात आला. महिलेचा गळा आवळून खून करून अज्ञाताने हे प्रेत कॅनॉलमध्ये फेकले. या घटनेची माहिती कळताच सेलू,निपाणी टाकळी येथील रहिवाशांनी एकच गर्दी केली होती. दुपारी अकराच्या सुमारास घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. हा खुनाचा प्रकार असून पोलीस पुढील शोध घेत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.