पाच महिन्यांपूर्वीचा शिवीगाळीचा वाद, तरूणाचा खून.

हाणामारीत एक जण जागीच ठार, तर मेहुणा-भावोजी असे दोघे जखमी .

पाच महिन्यांपूर्वीचा शिवीगाळीचा वाद, तरूणाचा खून.

कल्याण डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर परिसरात पाच महिन्यांपूर्वी केलेल्या शिवीगाळीचा वाद उफाळून आल्यानंतर झालेल्या. सशस्त्र हाणामारीत एक जण जागीच ठार, तर मेहुणा-भावोजी असे दोघे जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, पोलिसांनी 12 तासांच्या आत पाचही आरोपींना अटक केली. महेश गुंजाळ , निखिल माने , जयेश जुवळे , आशिष वाल्मिकी आणि श्रीनिवास सुगाला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी दत्तनगर परिसरात राहणारे आहेत.

या पाच जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात शिवाजी खंडागळे यांचा मृत्यू झाला. तर संतोष लष्कर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संतोष लष्कर यांच्या मुलीचा वाढदिवस होता. या वाढदिवसाला मेहुणा राजू धोत्रे आणि त्याचा मित्र शिवाजी खंडागळे हे दत्तनगरमध्ये राहणा-या संतोष लष्कर यांच्या घरी गेले. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास राजू धोत्रे, संतोष लष्कर आणि शिवाजी खंडागळे यांच्यात गप्पा सुरू होत्या. संतोष लष्कर याने मेहुणा राजू धोत्रे याला पाच महिन्यापूर्वी महेश गुंजाळ याने आपणास शिवीगाळ केल्याचे सांगितले.

यामुळे संतापलेल्या राजू धोत्रे याने महेश गुंजाळला फोन करून माझ्या भावोजीला शिवीगाळ का केली असा जाब विचारला?. त्यानंतर राजू धोत्रे, संतोष लष्कर आणि शिवाजी खंडागळे हे तिघे महेश केणे यांच्या प्रगती कॉलेजमागच्या कार्यालयाजवळ राहणाऱ्या महेश गुंजाळ याला जाब विचारण्यासाठी गेले. त्यांच्यात वादावादी झाली व महेश गुंजाळ व निखील माने या दोघांनी त्यांच्याकडील लोखंडी रॉडने, जयेश जुवळे व अण्या उर्फ श्रीनिवास सुगाला यांनी त्यांच्याकडील स्टंपने, तर आशिष वाल्मीकी याने त्याच्या हातातील तलवारीने राजू धोत्रे आणि त्याचा भावोजी संतोष लष्कर यांच्या डोके, पाठ, पायावर हल्ला चढवला. तर राजूचा मित्र शिवाजी खंडागळे याच्यावर महेश गुंजाळ व निखील माने या दोघांनी मिळून डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला.

या हल्ल्यात शिवाजी खंडागळे हा जागीच ठार झाला. त्यानंतर पाचही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या राजू धोत्रे व त्याचा भावोजी संतोष लष्कर या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या हल्ल्यातील जखमी राजू धोत्रे याच्या जबानीवरून महेश गुंजाळ, निखील माने, जयेश जुवळे, अण्या सुगाळा, आशिश वाल्मीकी या हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे .


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.