औरंगाबादमध्ये खूनाचे सत्र सुरुच, कुख्यात गुन्हेगाराचा चाकुने भोसकुन खून

मृत व्यक्ती सिटीचौक पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, घरफोडी आणि चोरीचे सात ते आठ गुन्हे होते दाखल..

औरंगाबादमध्ये खूनाचे सत्र सुरुच, कुख्यात गुन्हेगाराचा चाकुने भोसकुन खून

सुमित दंडुके/औरंगाबाद : शहरातील शहागंज परिसरात शुक्रवारी रात्री खूनाची घटना घडली आहे. पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जमील खान उर्फ जम्या याचा त्याच्याच नातलगाने चाकुने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच पोलीसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

मयत जमील खान हा किराडपुर्यातील रहिवासी आहे. मात्र तो शहागंज येथेच मजुरी करायचा. त्याच्यावर सिटीचौक पोलीस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचे सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सिटीचौक पोलिसांच्या रेकॉर्डवर होता. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहागंज येथील जुन्या मॉडर्न होटेलचे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत जमील आणि त्याचा नातलग असलेला तरुण शोएब खान यांच्यात पैश्यावरून वाद झाले. यावेळी शोएबने जमीलच्या छातीत, पोटावर आणि मांडीत चाकुने वार केले. यामुळे जमील गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला. आजुबाजूच्या लोकांनी धाव घेतली तोपर्यन्त आरोपी घटनास्थळवरून पसार झाला. लोकांनी लगेच जमीलला घाटी रुग्णालयात हलविले अपघात विभागातील डॉक्टरांनी जमीलला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी शोएबला काही तासातच अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

**शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलीसांसमोर आव्हान **

औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत गेल्या १५ दिवसांत दोन हत्या झाल्या. दुसरीकडे सीटी चौक, छावणी, सिडको एमआयडीसीमध्ये एक-एक हत्या झाल्याचं समोर आल आहे. म्हणजेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हत्येचं सत्र आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याच चित्र आहे. ही वाढती गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान सध्या पोलीसांसमोर आहे.

मयत जमील खान

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.