श्री डॉ. शिवानंद स्वामीजी यांना मुरघाश्री पुरस्कार जाहीर.

1 min read

श्री डॉ. शिवानंद स्वामीजी यांना मुरघाश्री पुरस्कार जाहीर.

हुलसूर येथील श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधीपती श्री डॉ.शिवानंद स्वामीजीना चित्रदुर्गचे पीठाधीपती प.पु.शिवमुर्ती मुरघाशरणरु यांनी मुरघाश्री पुरस्कार जाहीर केला आहे.

एम.एस.हुलसूरकर/हुलसूर: हुलसूर येथील श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधीपती श्री डॉ.शिवानंद स्वामीजीना चित्रदुर्गचे पीठाधीपती प.पु.शिवमुर्ती मुरघाशरणरु यांनी मुरघाश्री पुरस्कार जाहीर केला आहे. प्रशस्ती व एक लाख रुपये नगद असा सर्वात मोठा मुरघाश्री पुरस्कार दि.२४ आक्टोबंर रोजी देण्यात येणार आहे.
बसवेश्वराचे प्रसार व प्रचार करणारे तसेच द्रुष्ट चट व शांती संदेश देत जगभर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पादयात्रा करीत, बसवेश्वराचे विचार धारा प्रसार करणारे एकमेव शिवानंद स्वामीजी. विजापूर जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील लिंगापुर गावचे काशाम्मा गुरुपादय्या स्वामी यांच्या पोटी २ डिसेंबर १९५२ रोजी जन्म झाला. मुधोळ मध्येच प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. नंतर शिवयोग मंदिर व हुबळी ३००० मठात विद्याअभ्यास करून १९८० मध्ये परिसरातील श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठात भांतब्रर्याचे श्री शिवयोगेश्वर स्वामीजी यांच्या सानिध्यात संस्थानचे पीठाधीपती झाले. धार्मिक, शेक्षणिक , सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान ,३००० हजार खेड्यात भेट देवुन द्रुष्ट विचार चटाचे अभियान त्यांनी केले आहे.
१९९२ साली महाराष्ट्रातील किलारी येथे झालेल्या भूकंपा वेळी स्थळास भेट देऊन २७००० रुपये देणगी दिली होती. राज्यातील दुष्काळ प्रसंगी जनावरांसाठी १०१ खाद्य चारा छावण्या पुरवल्या होत्या. हुलसूर येथे प्रतिवर्षी शरण संस्कृती उत्सव भव्य प्रमाणात कार्यक्रम करतात व यामध्ये प्रामुख्याने जगभरातील मठाधीश साहित्य विदवांनाला बोलावून हित वचन महान कार्य करीत आहेत. शिवानंद स्वामीजी यांना साहित्य शक्ती, साहित्यिक आपार माहिती आहे त्यांनी तीन नाटक लिखाण करून प्रकाशन ही केले आहे. वचन शिवाशक्ती, कन्नड कोगीले कवण संकलन, कल्याण कैलास तत्व व अनेक कविता लिहिली आहेत.
मठाच्या पहिले अलमप्रभु पासून या मठाची स्थापना झालेल्या १९ वे मठाचे पीठाधीपती जगदगुरु श्री बसवकुमार शिवयोगी चीकमंगळुरु जिल्ह्यात जन्म घेतलेल्या शिवयोग मंदिरात योग साधना घेऊन येथे पीठाधीपती झाले पण त्याचे स्वप्न मठ हे जिर्णोद्धार करण्याचे होते पण ते स्वप्न साकार झाले नाही व ते कैलास वाशी झाले त्याचेही स्वप्न श्री डॉ शिवानंद स्वामीजीनी पू्र्ण केले आहे.