मुसळधार पावसाने धुवून नेला संसार.

1 min read

मुसळधार पावसाने धुवून नेला संसार.

बिदर: हुलसूर तालुक्यातील देवनाळ येथे दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने लोकांची दैना उडवली आहे.

बिदर: हुलसूर तालुक्यातील देवनाळ येथे दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने लोकांची दैना उडवली आहे.
बुधवारी मध्यरात्री देवनाळच्या हनुमान मंदिरासमोरील अनेक घरामध्ये पावसाचे पाणी शिरले. घरामध्ये गुडघ्याच्या वर पाणी आल्याने घरातील वृद्ध महिला, लहान मुलांचे अक्षरशः बेहाल झाले. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने प्रभाकर कोटमाळे या ग्रामस्थाच्या घरात लहान बाळ आणि बाळाच्या आईला अतिशय वाईट अवस्थेत रात्र काढावी लागली. घरात साचलेल्या पाण्याने अन्नधान्य, डाळी, तेल, मीठ-पीठ व अन्य जीवनावश्यक वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नाश झाला. त्यामुळे अनेक घरातल्या वृद्ध आणि मुलांची खायला नसल्याने उपासमार होत आहे. गेली दोन दिवस देवनाळकरांना खुपच जिकिरीचे गेले. पावसाचा जोर अजूनही ओसरलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे...