सोनपेठ तालुक्यात 'माझ गाव सुंदर गाव उपक्रम'

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'माझ गाव सुंदर गाव' उपक्रम राबविण्यात आला.

सोनपेठ तालुक्यात 'माझ गाव सुंदर गाव उपक्रम'

परभणी : सोनपेठ तालुक्यातील ग्रामपंचायती स्वच्छ व सुंदर व्हाव्यात या हेतूने जि. प. अध्यक्षा निर्मलाबाई विटेकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'माझ गाव सुंदर गाव' उपक्रम राबविण्यात आला.

२ मार्च रोजी सोनपेठ तालुक्यातील विटा खुर्द या ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यामधील सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांसाठी माझा गाव सुंदर गाव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि.प. अध्यक्षा निर्मलाबाई विटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार, गट विकास अधिकारी सचिन खुडे, नगरसेवक ॲड. श्रीकांत विटेकर, सरपंच मदन भोसले, श्रीराम भंडारे, संतोष लाडाने स्वच्छ भारत मिशन कक्षातील अधिकारी यांच्यासह तालुक्यातील सरपंच ग्रामसेवकांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विटा ग्रामपंचायतीमध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूने व स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली, गावातून जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर घाटाचे उद्घाटन करण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यात करुन गावफेरी काढण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी उपस्थित सरपंच, ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले.  परभणी जिल्ह्याला गोदावरीचा सुपीक पट्टा लाभलेला आहे त्यामुळे आपल्या परिसरात असलेल्या काटेरी  बाबळी काढून त्या ठिकाणी बांबूची किंवा फळांच्या वृक्षांची लागवड करावी,  तसेच मानव सगळ्या दृष्टीने बदलला परंतु हागणदारी व स्वच्छतेच्या बाबतीत अजूनही बदललेला नाही तो बदल गरजेचा आहे,  आपल्याकडे टीव्ही, मोबाईल, गाडी या सगळ्या गोष्टी आहेत परंतु शौचालय नाही ही परिस्थिती अतिशय भयावह आहे,  त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेचा अंगीकार करणे गरजेचे आहे. निसर्गातील पशुपक्ष्यांचा विचार करणे, चांगल्या फळ झाडांची जोपासना करणे, महिलांचा सन्मान आणि आई-वडिलांचा सांभाळ करणे, स्त्रीभ्रूणहत्या थांबवणे, रोगराई पासून बचाव करण्यासाठी शोषखड्डे ची निर्मिती करणे, अशा विविध विषयावर टाकसाळे यांनी मार्गदर्शन केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.