न.प.चा कंत्राटी कर्मचारी कोरोना बाधित

1 min read

न.प.चा कंत्राटी कर्मचारी कोरोना बाधित

कार्यालय वर्तुळात खळबळ

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली नगरपालिकेतील एक कंत्राटी कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. संक्रमण थांबविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आज गुरुवारी चार प्रभागांमध्ये अँटीजन टेस्ट व तपासणी शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते. दरम्यान आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार नगरपरिषदेतील आवक जावक विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्याशी संपर्क साधला असता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये करण्यात आली होती. मागील तीन दिवसांपासून सदर कर्मचारी हा संबंधित क्षेत्रांमध्ये कर्तव्यावर होता. त्याच्या संपर्कातील इतर दोन कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले असून त्यातील एकाचा अहवाल निगेटिव्ह असून दुसऱ्याचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान न. प. कर्मचारी बाधित असल्याचे समोर आल्यानंतर नगरपरिषद कार्यालय वर्तुळात खळबळ उडाली आहे.