नागपुर : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री नितिन राऊत यांच्या अध्यक्षेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नागपुर मध्ये सात दिवसाचा कडक लाॅकडाऊन असणार आहे. १५ मार्च ते २१ मार्च पर्यत हा लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी विना कारण घरा बाहेर पाडु नये असे आव्हान पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. गेल्या काही दिवसापासुन नागपुरात कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.
**नागपुरात काय बंद, काय सुरु **
-
सरकारी कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु राहणार
-
खासगी कार्यलाये पुर्ण बंद असतील
-
लसीकरण सुरु राहणार
-
मद्य विक्री बंद राहणार आहे
-
डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकाने सुरु असतील