नागतीर्थवाडी ठरले मराठवाड्यातील १००% कोविड लसीकरण पूर्ण करणारे पहिले गाव

अक्का फाऊंडेशनच्या पुढाकारातून शक्य...

नागतीर्थवाडी ठरले मराठवाड्यातील १००% कोविड लसीकरण पूर्ण करणारे पहिले गाव

देवणी : अक्का फाउंडेशनच्या पुढाकारातून नागतीर्थवाडी गावाने सर्व गावाचे कोविड लसीकरण १००% पूर्ण करत मराठवाडा विभागात पहिले लसीकरणयुक्त येण्याचा मान मिळवला आहे. नागतीर्थवाडी देवणी तालुक्यातील पहिले निर्मलपुरस्कृत गाव अवघ्या ६७४ लोकसंख्या असलेल्या या गावाने गावातील १८ वर्षावरील सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण केले. अंतिम टप्प्यात गावातील अतीवयोवृद्ध व दिव्यांग लोकांना लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम राबवित लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. आणि ग्रामस्थांनी साथ देत गाव करोनामुक्त करण्यात यश मिळाले.

या मोहिमेत निलंगा विधानसभा मतदार संघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सूचना आक्का फाउंडेशनच्या माध्यमातून अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वेळोवेळीचे मार्गदर्शन व अक्का फांऊडेशनचे समन्वयक रामलिंग शेरे याचे सहकार्य हे महत्त्वाचा घटक आहे.

यामध्ये प्रशासक म्हणून देवणीचे तहसीलदार सुरेशजी घोळवे, आणि देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी गावात वेळोवेळी भेटी देऊन नागरिकांना लशी बाबतीत सखोल मार्गदर्शन लाभले. तसेच आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, तालुका आरोग्य डॉ.गुरमे, वैद्यकीय अधिकारी चैतन्य हत्ते यांनी लस उपलब्धता करून देण्यात सहाय्य केले.

प्रत्यक्षात लस देण्यासाठी गावात येऊन लसीकरण आपल्या दारी माध्यमातून वयोवृद्ध व अपंगाना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अमोल नरहरे, आरोग्य सेविका सुरवसे शोभा, बिरादार आर.व्ही. , मळभागे जे.के. आशा कार्यकर्त्या भूमिका कासले गावातील राज गुणाले, उपसरपंच विष्णुदास गुणाले, ग्रामसेवक श्रीकांत पताळे सर्व ग्रा.प. सदस्य यांनी परीश्रम घेतले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.