‘नाईकांचा पुरस्कार चव्हाणांच्या नावावर’

1 min read

‘नाईकांचा पुरस्कार चव्हाणांच्या नावावर’

'जलक्रांतीचे जनक' संदर्भातील "तो" वादग्रस्त शासन निर्णय रद्द करण्यासाठी वसंत-विचारधारा मंच ची मागणी.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष-महसूलमंत्री थोरात यांनी घेतली गंभीर दखल*

सिध्देश्वर गिरी/प्रतिनिधी: जलक्रांतीचे जनक म्हणून सुधाकर नाईक यांच्या नावे दिल्या जाणारा जलभूषण पुरस्कार. यावर्षी शासनाने मराठवाडा व विदर्भ यांच्यात श्रेया वादाची लढाई उभारत नांदेडमधील वजनदार नेतृत्वाच्या दबावतंत्रामुळे शंकरराव चव्हाण यांच्या नावे देण्याचा वादग्रस्त शासन निर्णय नुकताच काढला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाच्या भावनांसोबत ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने वेगवेगळ्या संघटनांनी जिल्हा पातळीपासून राज्यपातळीपर्यंत, हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
ग्रामीण भागात शासन निर्णयाची होळी करून,आपला राग व्यक्त करण्यात आल्याचेही कळते. हा वादग्रस्त शासन निर्णय रद्द करण्यासाठी वसंत विचारधारा मंच मुंबईच्या वतीने नुकतीच महाराष्ट्रातील विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन. आपली व्यथा मांडली यासोबतच त्यांनी महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊनही हा वादग्रस्त शासन निर्णय रद्द करण्याचे निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,सुधाकरराव नाईक यांनी पाणी विषयावर मोठ्या प्रमाणात आपले योगदान दिल्याचे अनेक निर्णय पाहता येतील. त्यांनी राज्याला पाणी आडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र देऊन देशात सर्वप्रथम जलसंधारण खाते निर्माण केले आणि याद्वारे राज्यासोबतच देशात जलक्रांती राहिल्याचे उदाहरण सर्वश्रुत आहे. त्यांनी राज्यात जलक्रांतीचे बीज लावल्याने जलसमृद्ध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केल्या जातो. यासोबतच त्यांनी पाणलोट क्षेत्र योजनाही कार्यान्वित करून महाराष्ट्राच्या जमिनी सिंचनाखाली आणण्याचे काम केले.
WhatsApp-Image-2020-09-19-at-4.01.52-PM
वसंतराव नाईक यांच्या हरितक्रांती करण्यात सुधाकरराव नाईक यांच्या जलक्रांतीनेच योगदान दिले असल्याचे दिसते. मात्र जलक्रांतीच्या दूरगामी कामाचे श्रेय चोरून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना देण्याचा वादग्रस्त,चुकीचा व अन्यायकारक निर्णय कृती जलसंधारण विभागाने विशिष्ट मंत्र्याच्या आग्रहाखातर केलेला आहे. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा शासन निर्णय केलेला आहे.
यामुळे समस्त बंजारा समाजासोबतच ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या असून. जलक्रांतीचे प्रणेते असणाऱ्या महाराष्ट्रातील एका कुशल प्रशासकास बाजूला ठेवण्याचे काम या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या माध्यमातून हा शासन निर्णय रद्द न झाल्यास संवैधानिक मार्गाने आंदोलन करणार असल्याचा निर्धारही वसंत विचारधारा मंचच्या वतीने निवेदनातून करण्यात आला आहे.
हा वादग्रस्त शासन निर्णय रद्द करण्यासाठी दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी शासन आपल्यासोबत असून. या चुकीच्या शासन निर्णयास श्रेयवाद करणाऱ्याला पाठीशी घालणार नसल्याचे. सूतोवाच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबतच महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या निवेदनाला उत्तर देताना केले आहे.