नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी,नागरिकांत भितीचे वातावरण.

1 min read

नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी,नागरिकांत भितीचे वातावरण.

या सांडपाण्यामुळे मलेरिया, डेंग्यू ची साथ पसरल्याने नागरिकांत भितीचे वातावरण.

एम.एस. हुलसूरकर/हुलसूर: हुलसूर तालुक्यातील देवनाळ येथे नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आलं आहे. नागरीकांच्या घरासमोर तळ साचल्याने दुर्गंधी सुटली आहे.
यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारातील अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. अगोदरच कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता गावात मलेरिया व डेंग्यू ची लागण झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे व नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे . गडीगौडगाव ग्रामपंचायत खाली देवनाळ मध्ये चार ग्रामपंचायत सदस्य असुन देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तुंबलेल्या नाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आल्याने याच पाण्यामध्ये आळ्या होऊन दुर्गंधी सुटली आहे. यापाण्यामुळे वृद्ध नागरिक व लहान मुले यामध्ये खड्यात पडत आहेत. त्यामुळे तुंबलेल्या नाल्यातील पाणी लवकरात लवकर बाहेर काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.