नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांच नाव द्या-राज ठाकरे

जे नाव आधी आहे, तेच नाव राहणार. ते तुम्ही कसं बदलणार...

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांच नाव द्या-राज ठाकरे

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरावरुन आता जोरदार राजकारण रंगताना दिसत आहे. या वादामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. एकीकडे स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकार या विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भुमिका मांडली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, विमानतळांचं नामकरण करण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आदरणीय आहेत. दि. बा. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. दोन्ही नेत्यांच्या मोठेपणाबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच नाव योग्य वाटतं. अस स्पष्ट मत राज ठाकरे मांडले आहे.

विमानतळाच्या नावाचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला गेला की नाही माहीत नाही. पण आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलतोय याचं भान आपल्याला असायला हवं. त्याला जे नाव आधी आहे, तेच नाव राहणार. ते तुम्ही कसं बदलणार,' असा सवाल राज यांनी केला. 'शिवाजी महाराजांच्या नावावर चर्चा होऊच कशी शकते? बाळासाहेब स्वत: असते तरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव द्या असं सांगितलं असतं,असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.