पुण्याचे नाव संभाजीनगर करा-प्रकाश आंबेडकर

औंरगाबादचे नाव संभाजीनगर न करता पुण्याचे नाव संभाजीनगर करा असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरानी केला.

पुण्याचे नाव संभाजीनगर करा-प्रकाश आंबेडकर

श्वेता भेंडारकर/पुणे: औरंगाबाद शहराचा नामांतराचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे नामांतर करण्याची मागणी पुढे येत आहे. नामांतराची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र नामांतरासाठी ठाम विरोध केला आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद ऐवजी पुण्याचे नाव संभाजीनगर करा,अशी मागणी केली आहे.

औरंगाबाद हे ऐतिहासीक शहर असुन ते ऐतिहासिकच राहायला हवे,मुघलांच्या काळात औरंगाबाद ही राजधानी होती. पाच वर्षे सत्तेत असताना भाजप व शिवसेना औरंगाबादचे नाव का बदलेले नाही,असा सवाल त्यांनी केला आहे.संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झाले आहेत. पुणे जिल्ह्यात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचे स्मरण राहावे, असे वाटत असेल तर ती योग्य भूमी पुणे आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचे नाव दिले तर अधिक योग्य होईल,अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.

ads

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.