नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गावे समाविष्ट करा.

1 min read

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गावे समाविष्ट करा.

आर्थिक मदत देण्यापेक्षा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही शेतक-यांना बळकट करेल.रामेश्वर मोकाशे यांची निवेदनाद्वारे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ : महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात शेती व आधारित व्यवसायावर मोठ्या प्रमाणात विकासनिधी खर्च करण्याचे धोरण अवलंबविले आहे.मात्र हा विकास करीत असताना काही योजनेतून अधिका-यांच्या नियोजनामुळे आणि स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे काही गावे वगळली असल्याचा प्रकार झाला आहे.यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना हे उदाहरण ताजे असून शेती व्यवसायासोबतच शेतक-यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी करण्यात येणा-या नियोजनातून ही गावे वगळली असल्याचा आरोप युवासेनेचे सोनपेठ तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे एका निवेदनातुन केला आहे.
WhatsApp-Image-2020-07-07-at-3.33.16-PM-1
यासोबतच त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत कान्हेंगाव,शिर्शी(बु.),शिरोरी या तीन गावांचा समावेश करण्याची मागणीही केली आहे.या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आ हे की,वरील गावे विकासापासून कोसो दूर असून या गावांचा विकास साधण्यासाठी येथील शेतक-यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे.ही आर्थिक उन्नती करत असताना शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड देत असतो.यात या शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यापेक्षा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही शेतक-यांना बळकट करण्यासाठी आहे.त्यामुळे वरील गावाचा समावेश केल्यास शेतक-यांचेच हात बळकट होतील व आर्थिक उन्नती होण्यासाठी मदत होईल पाणी असूनही शेतक-यांना त्यांच्या शेतापर्यंत या पाण्याचा उपयोग करता येत नाही त्याचे कारण म्हणजे त्यांच्या नशिबी येणारी आर्थिक अडचण हिच सर्वात मोठी विवंचना शेतक-यांच्या नशिबी आहे.सदर गावाचा या योजनेत समावेश केल्यास वरील अडचण दूर होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल अशी खात्रीही मोकाशे यांनी व्यक्त केली आहे