सर्जा राजाचा सण 'पोळा', जाणून घ्या महत्व

सर्जा राजाचा सण 'पोळा', जाणून घ्या महत्व

महाराष्ट्राचा राष्ट्रीय सण पोळा. कऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. बैलपोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा करतात. या दिवशी शेतकरी आपापल्या बैलाची सजावट करून बैलांची पूजा करतात. या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध वस्तुंनी सजवतात. गळ्यात सुंदर घंटा, पायात घुंगरू, शिंगाना रंगवतात. माळी, विविध वस्तुंनी आपल्या बैलांना सजवतात, नटवतात, हा सण पावसाळ्यात पेरणी संपल्यावर साजरा करतात. बैलांना सजवून सर्व शेतकरी बांधव आपले बैल घेऊन गावातील मंदिराजवळ एकत्र होतात. तिथे त्या बैलांची यथोचित पूजा करतात, त्यांना नेवेद्य देतात.

बैलांप्रती कृतज्ञता
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलपोळा सण यावर्षी 6 सप्टेंबर रोजी आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा सण असतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात आणि बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.

बैलपोळ्याचे महत्त्व
बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.

काय होती जुनी प्रथा
'पोळ' म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा जुन्या काळात होती आता अनेक शेतकऱ्याकडेच बैल नाहीत तर गावावर बैल सोडणार कुठून? या बैलाला काही ठिकाणी पोळ म्हणतात तर काही ठिकाणी 'पोळ्याचा वळू' तर काही गावात या बैलालाच पोळा म्हणतात. या बैलाला गावावर सोडण्यापूर्वी त्याला धुऊन, रंगवून सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात 'तू वासरांचा पिता अशा अर्थाचा मंत्र म्हणत. 'हा तुमचा पती आहे.’ अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत. पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार, आणि मोठ्याने डिरक्या देणारा बैलच निवडला जायचा.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.