काँग्रेसला पोळणार नव'ज्योत'

पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी क्रिकेटपटु नवज्योतसिंग सिद्धु यांची निवड करण्यात आली आणि मालविंदरसिंग माली हे त्यांचे सल्लागार आहेत.

काँग्रेसला पोळणार नव'ज्योत'

पंजाबः "काश्मिर हा स्वतंत्र देश आहे आणि भारत त्यावर ताबा मिळवू पाहतो आहे, इंदिरा गांधी या शिख हत्याकांडाच्या सुत्रधार आहेत", अशी वाक्य ऐकु आली तर निश्चितल आपला संताप होईल. पण ही वाक्य आम्ही म्हटलेली नाहीत तर काँग्रेसच्या पंजाब शाखेच्या राज्याचे सल्लागार मालवेंदरसिंह माली यांनी ही रंजक, संतापजनक आणि आश्चर्यकारक विधानं केली आहेत. पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी क्रिकेटपटु नवज्योतसिंह सिद्धु यांची निवड करण्यात आली आहे. सिद्धु हे पवित्र काँग्रेसचे आहेत त्यांना अमरेंदरसिंग यांच्या बोकांडी अध्यक्ष म्हणून बसवण्यात आलं. त्यानंतर लगेच सिद्धुंनी एक समिती नेमली. त्यासंदर्भातील एक पत्रही प्रसारित झालं आणि त्यात मालविंदरसिंह माली हे एक नाव होतं. सल्लागाल असलेल्या मालवेंदरसिंह यांनी असे बदसल्ले देण्यास सुरुवात केली आहे की ज्यामुळे गोंधळ निर्माण होईल.

काँग्रेससाठी इंदिरा गांधी काय आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. इंदिरा गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रमाता आहेत आणि त्यांच अत्यंत आदराचं स्थान आहे.त्यांच्याविषयी काँग्रेसजनांच मत काय असावं हे कोणीही सांगण्याची गरज नाही, अगदी देवस्थानी इंदिरा गांधी असायला हव्यात. मात्र या मालविंदरसिंहांनी समाज माध्यमांवर एक फोटो टाकला ज्यात कवट्यांच्या ढिगा-यावर इंदिरा गांधी उभ्या आहेत आणि त्यांच्या हातात एक कवटी लावलेला भाला आहे. ऑपरेशन ब्लु स्टारशी संबंधीत हे चित्र आहेत. काँग्रेसचेच सल्लागार असलेल्या व्यक्तिने हा फोटो प्रसारित केला पण राहुल गांधी, सोनीया गांधींनी तो स्विकारला कसा? हा मोठा प्रश्न आहे. ज्या कॅप्टन अमरिंदरसिंगांना त्रास व्हावा किंवा त्यांच्या अधिकारात कपात व्हावी म्हणून नवज्योतसिंग सिद्धुला नेमण्यात आलं त्यांच्याच सल्लागार मंडळातील एका व्यक्तिने ही पोस्ट टाकली.

दुसरी गोष्ट म्हणजे हे मालविंदरसिंह इतक्या बेताल आणि निर्लज्यपणे बोलत आहेत की प्रत्येक भारतीयाला त्यांच्या वक्तव्याचा प्रचंड राग येईल. ते म्हणाले की, "काश्मिर हा स्वतंत्र देश आहे आणि भारत त्यावर ताबा मिळवु पाहतो आहे." मेहेबुबा मुफ्तींनीही देशालाच इशार दिला, तालिबानमध्ये काय झालं ते पहा, भारतात काय होईल असं त्या म्हणाल्या. मालींनीतर काश्मिरला स्वतंत्र देशच म्हणून टाकलं, असं म्हणणारा व्यक्ति काँग्रेसचा सल्लागार आहे म्हटल्यावर त्या पक्षाचा विकास, उत्कर्ष आणि विजय कसा मिळेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुळात कॅप्टन अमरिंदरसिंगांसारख्या देशभक्त आणि काँग्रेसला यश देऊ शकणा-या मुख्यमंत्र्याला नियंत्रीत करण्यासाठी सवंग, बडबोला, विनोदवीर, वाचाळवीर, फायद्यासाठी भाषा बदलणारा एक क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धु याला पंजाब काँग्रेस बहाल केलं गेलं, त्यांच योगदान काय? हा मोठा प्रश्न आहे.

अशा नवज्योतसिंग सिद्धुंनी नेमलेला सल्लागार असं विधान करत असेल तर त्यावर काँग्रेसने काय करायला हवं? आजवर तरी काँग्रेसने काहीही केलेलं दिसत नाही. असे सल्लागार पक्षाचं नुकसान करत असतात हे काँग्रेस पक्षाला समाजणं गरजेचं आहे. पण काँग्रेसला गांधी या नावाच्या पलीकडे काहीही दिसत नाही. त्यांना कवट्यांच्या डोंगरावर उभं केलं तरी शिखरावर उभं केलं असं जर काँग्रेस म्हणणार असेल तर यापेक्षा दुर्देव काय असणार.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.