हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं- एकनाथ शिंदे

मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार

हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं- एकनाथ शिंदे

मुंबई : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी कारवाईला मोठं यश आलं आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन या कारवाईबदल पोलिसांचे कौतूक केले आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हटलं की, कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी ६० पथकाच्या जवानांनी शनिवारी १३ नोव्हें. रोजी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी ६० जवानांचं मनापासून अभिनंदन. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील हे मोठं यश आहे. तसेच पोलिस आणि नक्षली चकमकीत कारवाईत चार पोलिसही जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. शासन त्यांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही. नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यापुढेही अशाच पद्धतीने सुरू ठेवली जाईल, असेही शिंदे म्हणाले.

दरम्यान, गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.