नीट – जेईई च्या परिक्षा सप्टेंबर मध्ये होणार नवीन वेळापत्रक जाहीर.

1 min read

नीट – जेईई च्या परिक्षा सप्टेंबर मध्ये होणार नवीन वेळापत्रक जाहीर.

आपल्या शहरातील परीक्षा केंद्र निवडता येणार

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक

नवी दिल्ली: इंजिनियरिंग व वैद्यकिय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या नीट आणि जेईईच्या परीक्षा आता जुलै ऐवजी सप्टेंबर मध्ये होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.
कोरोना विषाणू च्या संकटामुळे नीट व जेईई परीक्षेचे वेळापत्रक परिस्थिती बघून वेळोवेळी बदलण्यात आले. जेईईच्या मुख्य परिक्षा 5 एप्रिल 2020 ते 11 एप्रिल 2020 दरम्यान तर नीट ची परिक्षा 3 मे 2020 रोजी होणार होती. नंतर पुन्हा वेळापत्रक बदलण्यात आले एप्रिल ऐवजी जुलै मध्ये परिक्षा घेण्याच निर्णय घेण्यात आला.
आता परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे ते पुढील प्रमाणे-
जेईई मुख्य परीक्षा 1 सप्टेंबर 2020 ते 6 सप्टेंबर 2020 ला होतील, नीट (MBBS,BDS) च्या परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर नीट चा ऑक्टोंबर मध्ये लागेल. जेईई अँडव्हान्स ची परीक्षा 27 सप्टेंबर ला होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षेशाठी विद्यार्थ्याना आपल्या शहरातील परीक्षा केंद्र निवडता येणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी चे महासंचालक विनीत जोशी यांनी दिली आहे. त्यासाठी 4 ते 15 जुलैपर्यत परीक्षा केंद्राचे पर्याय NTA च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नव्या तारखांची घोषणा केली. आरोग्य मंत्रालयाच्या सुचना पाळून परीक्षा घेतल्या जातील असेही ते म्हणाले.