नेहा धुपिया दुसऱ्यांदा 'आई' बनणार

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी..

नेहा धुपिया दुसऱ्यांदा 'आई' बनणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता-मॉडेल अंगद बेदी यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेहा धुपिया प्रेग्नेंट आहे. अंगद आणि नेहा लवकरच आपल्या दुसर्‍या बाळाचे स्वागत करणार आहेत.

अलीकडेच नेहा धुपियाने ही चांगली बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तिच्या बेबी बंपसह एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना नेहाने लिहिले, ‘हे कॅप्शन ठरवण्यात २ दिवस लागले… आणि मला वाटतं सुचलेलं सगळ्यात उत्तम म्हणजे देवा तुझे खूप आभार…’

या फोटोमध्ये नेहा सोबतच तिचा नवरा अंगद बेदी आणि मुलगी मेहरही दिसत आहेत. तिघांनीही ब्लॅक कलरचे मॅचिंग कपडे घातले आहेत. नेहा धुपिया बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा फॅमिली फोटो खूपच सुंदर दिसत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.