नेपाळ सीमेवर गोळीबार तिघे जखमी,एक भारतीयाचा मृत्यू

1 min read

नेपाळ सीमेवर गोळीबार तिघे जखमी,एक भारतीयाचा मृत्यू

चीन नंतर नेपाळ बॉर्डरवर तनाव

स्वप्नील कुमावत:भारत आणि नेपाळमध्ये सीमा वाद सुरू असून नेपाळला लागूण बिहारची सीमारेखा आहे. शुक्रवारी
दि.12 जुन रोजी नेपाळकडून सीमा भागात गोळीबार करण्यात आला. गोळीबारात एका भारतीयाचा मृत्यू झाला, तर तिघे जाखमी झाले आहेत. एसएसबीचे डिजी कुमार राजेश चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, नेपाळच्या सैनिकांनी 15 राउंड फायर केले. यातील 10 राउंड हवेत फायर करण्यात आले. यादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. या ठिकाणी गोळीबारात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. यापुर्वी मारहाणीच्या घटना झालेल्या आहेत.
बिहारच्या सीतामडीच्या सोनबरसा बॉर्डर परिसरातील जानकीनगर गावात ही घटना घडली. सीमेजवळ काही लोक शेतात काम करत होते. यादरम्यान नेपाळच्या सैनिकांकडून फायरिंग करण्यात आली. फायरिंगमध्ये जानकीनगर टोले लालबंन्दी रहिवासी डिकेश कुमार वय 25 वर्ष यांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. यातील दोघे गंभीर आहेत. जखमींना सीतागडीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
8 जुन रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लिपूलेखवरून धाराचूलापर्यत बनवण्यात आलेल्या रस्ताचे उद्घाटन केले. नेपाळने लिहूलेखना आपला भाग सांगत विरोध केला. 18 मे रोजी नेपाळने आपल्या देशाच्या नवीन नकाशात भारतातील लिपूलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानीला नेपाळमध्ये दाखवले. नेपाळच्या नव्या नकाशाला संविधानात सामील करण्यात आले. परंतु भारताने याचा विरोध केला,तो भाग भारताचा आहे. यामुळे भारत आणि नेपाळमधे मागील काही दिवसांपासून सीमावाद सुरु आहे.