नेपाळी अधिका-यांचे भारतात सात दिवसांचे प्रशिक्षण

1 min read

नेपाळी अधिका-यांचे भारतात सात दिवसांचे प्रशिक्षण

राजस्थानच्या जोधपूरमधील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये हे प्रशिक्षण सुरू केले.

नेपाळमधील एकूण तीस न्यायालयीन आधिकारयांच्या समुहाने व्यवस्थापन आणि न्याय प्रशासनात माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी सात दिवसांचे विशेष प्रशिक्षण भारतात सुरू केले आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या तुकडीचा भाग असणारया अधिकारयांनी सोमवारी राजस्थानच्या जोधपूरमधील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये हे प्रशिक्षण सुरू केले.

हा प्रशिक्षण कार्यक्रम विशेषतः नेपाळ सरकारच्या विनंतीनुसार तयार करण्यात आला आहे ज्यास भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याने (आयटीईसी) पाठिंबा दिला आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन अधिकारयांची दुसरी तुकडी २३ चे २९ मार्च दरम्यान प्रशिक्षण सुरू करणार असल्याचे येथील भारतीय दूतावासाने सांगितले.