साईंच्या दर्शनासाठी नवीन नियमावली

कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे साई मंदिराचा कालावधी कमी करण्यात आलाय...

साईंच्या दर्शनासाठी नवीन नियमावली

शिर्डीः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिर्डी मधील साई मंदिराची वेळ भाविकांसाठी कमी करण्यात आली. साईबाबांच्या दर्शनासाठी नवीन नियनमावली देखिल जारी करण्यात आली आहे. गुरूवारची साई पालखी देखील रद्द करण्यात येणार आहे. तसेच संचारबंदी लक्षात घेता, पहाटे काकड आरती आणि रात्रीची शेजारती भक्तांविना करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

साईबाबांचे मंदिर हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असल्यामुळे येथे जगभरातील भाविक दर्शनासाठी येतात. कोरोनाचे संकट वाढत असल्याने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबद साई संस्थानाचे सिईओ यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी नागरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मास्कचे वाटप नागरिकांना करण्यात आले.

शहरात विनामास्क दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपये दंड आकारणी केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी म्हटले आहे. मोठ्या रकमेचा दंड आकारुन पैसे जमा करणे हा नगरपंचायतचा उद्देश नसून शिर्डी शहराला पुन्हा लॉकडाऊन पासून वाचवणे तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी या उपाययोजना केल्या जात आहे. आज ही शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक विना मास्क फिरताना दिसून येत आहे. व्यावसायिक, दुकानदार कोविड नियम पाळत नाही, मास्क वापरणे बंधनकारक असून देखील मास्क वापरत नाही अशा सर्वांना नगरपंचायतच्या पदाधिकऱ्यांनी चांगलाच दम देखील दिला आहे. मास्क वापरा नाही तर उद्यापासून एक हजार रुपये भरा अशी मोहिम नगर पंचायतीने हाती घेतली असून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शिर्डीतील नागरिकांना करण्यात आले आहे.

नियमावली

  • दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत असणार आहे.
  • सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेज आरती भक्तगणांसाठी खुली असणार आहे.
  • मुख दर्शन सुविधा फक्त या कालावधीत कोविड मार्गदर्शक तत्वे अनुसुरून चालू ठेवण्यात येणार आहे.
  • गुरुवारची पालखी व्यवस्था देखील या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे.
  • बायोमेट्रिक पास काऊंटरवर होत असलेली गर्दी पाहता गुरूवार, शनिवार, रविवार तसेच उत्सवाचे दिवस बायोमेट्रिक पास काऊंटर बंद करण्यात आले आहे. ऑनलाईन दर्शन पास व्यवस्था चालू असणार आहे.
  • भक्तांची दर्शन रांगेत ढोबळ चाचणी करण्यात येणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी १५० तर गुरूवार, शनिवार आणि रविवारी २०० जणांची चाचणी घेण्यात येणार आहे.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.