शिर्शी-शिरोरी-कान्हेगाव रस्त्याची नव्याने निविदा काढा-रामेश्वर मोकाशे

1 min read

शिर्शी-शिरोरी-कान्हेगाव रस्त्याची नव्याने निविदा काढा-रामेश्वर मोकाशे

शिर्शी-शिरोरी-कान्हेगाव या रस्त्याचे काम पूर्वी परळी येथील साईनाथ कन्स्ट्रक्शन या एजन्सीला देण्यात आले होते. मात्र काम पूर्ण होण्यास विलंब लावण्यात येत असल्याने,सदर काम रद्द करण्यात आले आहे.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: शिर्शी-शिरोरी-कान्हेगाव या रस्त्याच्या कामाची निविदा काढून नव्याने सुरुवात करण्याची मागणी, युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी एका निवेदनाद्वारे ग्रामीण रस्ते विकास विभागाच्या परभणी कार्यालयास केली आहे.

युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे

शिर्शी-शिरोरी-कान्हेगाव या रस्त्याचे काम पूर्वी परळी येथील साईनाथ कन्स्ट्रक्शन या एजन्सीला देण्यात आले होते. मात्र काम पूर्ण होण्यास विलंब लावण्यात येत असल्याने,सदर काम रद्द करण्यात आले आहे. आता नव्याने या कामाची निविदा काढून कर्तव्य पार पाडत चांगल्या दर्जाचे काम करणाऱ्या कंपनीस काम देऊन न्याय देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा युवासेनेच्या वतीने ग्रामीण रस्ते विकास विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सदर निवेदनातुन देण्यात आला आहे.