ग्रामीण भागाच्या विकासामध्ये स्वयंसेवी संस्थांचा मोठा वाटा -डॉ सिध्दार्थकूमार सुर्यवंशी.

1 min read

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये स्वयंसेवी संस्थांचा मोठा वाटा -डॉ सिध्दार्थकूमार सुर्यवंशी.

देशात शहरीकरण झपाट्याने होत असताना ग्रामीण भागाचा सुध्दा चिरस्थाई समन्यायी विकास होणे गरजेचे आहे. हे कार्य ग्रामस्तरावर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होत असून. ग्रामीण भागाच्या विकासात स्वयंसेवी संस्थेचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन युवकनेते डॉ.सिध्दार्थकूमार सुर्यवंशी यांनी केले.

अहमदपुर: देशात शहरीकरण झपाट्याने होत असताना ग्रामीण भागाचा सुध्दा चिरस्थाई समन्यायी विकास होणे गरजेचे आहे. हे कार्य ग्रामस्तरावर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होत असून. ग्रामीण भागाच्या विकासात स्वयंसेवी संस्थेचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन युवकनेते डॉ.सिध्दार्थकूमार सुर्यवंशी यांनी केले.
फंड एनजीओच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजीत सेवा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कमलाकर तिकटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या रेखाताई तरडे, पं.स.उपसभापती बालाजी गुट्टे, रामनाथ पलमटे, कुलदीप हाके, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शालूताई तरमुडे आदींची उपस्थिती होती. सुरूवातीला डॉ.सिध्दार्थकूमार सुर्यवंशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
पुढे बोलताना डॉ.सुर्यवंशी म्हणाले की, निती आयोगाच्या माध्यमातून देशातील स्वयंसेवी संस्थांना संलग्नीत करण्यात येवून. शासनाच्या ध्येयधोरणानुसार विविध उपक्रमात संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे. या विविध शासकीय योजना स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेवून. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत त्या पोहचवाव्यात असे आवाहन केले.
भाजपा महिला जिल्हाध्यक्ष प्राचार्य रेखाताई तरडे यांनी महिलांच्या विविध प्रश्नांसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे येवून काम करण्याची गरज व्यक्त केली. या वेळी बाळासाहेब गूट्टे,कमलाकर तिकटे आदी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा जिल्हाउपाध्यक्ष अण्णाराव सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.चंद्रमणी गायकवाड यांनी केले. तर आभार तालुकाध्यक्ष सुभाषराव साबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिलाताई शिंदे, लक्ष्मण शेळके आदींनी पुढाकार घेतला.