अब शर्माना क्या?

एनआयएने प्रदीप शर्माच्या घरावर सकाळी सहा वाजता छापा टाकला. त्याच्या संपूर्ण घराची झडती घतली आणि त्यानंतर प्रदीप शर्माला अटक करण्यात आली.

अब शर्माना क्या?

महाराष्ट्रः लातुरमध्ये एक घटना घडली, परंतु या घटनेची कोणतीही माहिती लातुर पोलीसांकडे नाही. एनआयएच्या टीमने दोन व्यक्तिंना पकडुन नेलं. हे दोघेही मुळचे लातुरचे नव्हते, तर ते मुंबईचे होते. परंतु चोरुन लातुरमध्ये रहात होते. या दोघांना उचलुन नेल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएने छापा टाकला. छापा टाकला, तेव्हा प्रदीप शर्मा लोणावळ्यात होते. ते जिथे होते, त्या रिसॉर्टवरसुद्धा एनआयएच्या टीमने छापा टाकला आणि त्यांना मुंबईला नेण्यात आलं.

अँटीलिया बाहेर ठेवण्यात आलेली स्फोटकं लातुरमधल्या या दोघांनीच ठेवल्याचा अंदाज आहे. अटक केल्यानंतर त्यांचा संबंध प्रदीप शर्माशी असल्याचं समोर आलं. प्रदीप शर्मासोबत आणखी कोण यात अडकणार, हे येणारा काळच ठरवेल. अँटीलियाचं स्फोटक प्रकरण हे महाराष्ट्रातच नाही तर संपू्र्ण देशात गाजलं, त्यामागे कारणही तसंच होतं कारण अँटीलिया हे साध्या माणसांचं घर नाही. सहाजिकच स्फोटकं आणि अंबानी असा विषय असल्याने एनआयएचा त्यात प्रवेश झाला, आणि भयंकर सत्य बाहेर पडू लागलं. सचिन वाझेला अटक झाली आणि वाझे आता तळोजा कारागृहात बंदिस्त आहे. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा थांबली होती. यापुर्वी अनिल देशमुख, अऩिल परब यांची नावं यात घेण्यात आली होती आणि आता आणखी कोणाला यात गोवलं जाणार याबाबतची चर्चा रंगु लागली.

अशातच हे प्रकरण शांत झालं की काय, असं वाटु लागलं होतं. मात्र एनआयए आपलं काम करतच होतं. सगळ्यात मोठी घटना घडली ती लातुरमधुन दोन तरुणांना अटक करण्याची आणि त्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाने वेग धरला. हे दोघं लातुरला कसे गेले, कोणाकडे रहात होते याचा तपास आता सुरु आहे. या दोघांना अटक केल्या बरोबर याची मोठी बातमी झाली. हि अटकेची घटना समोर येवून दोन दिवस होत असतानाच, एनआयएने प्रदीप शर्माच्या घरावर सकाळी सहा वाजता छापा टाकला. त्याच्या संपूर्ण घराची झडती घतली आणि त्यात काही वस्तू सापडल्या आहेत. या वस्तु काय होत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु एनआयएची टीम बाहेर आली तेव्हा काही कागदपत्र आणि वस्तु त्यांच्याकडे होत्या. त्यानंतर प्रदीप शर्माला अटक करण्यात आली.

सचिन वाझे पोलीस दलातुन निलंबीत झाल्यानंतर त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता. तसंच प्रदीप शर्मा यांनाही शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या हाताने त्यांनी शिवबंधन बांधुन घतलं आहे. प्रदीप शर्मा हे वरच्या पदावर होते आणि वाझे त्यांच्या टीममध्ये होते. वाझे, शर्मा, दया नायक ही सगळी मंडळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणुन प्रसिद्ध आहेत. अनेकांना ठोकल्याची नोंद त्यांच्या नावावर आहे. त्यातील दोघे हे एकाच टिममध्ये असतात, एकाच पक्षात त्यांचा समावेश होतो आणि अँटिलिया प्रकरणात याच दोघांची नावं समोर येवू लागतात. यात महत्वाची गोष्ट अशी की, सचिन वाझेला अटक झाल्यानंतर त्यांचा संबंध अँटिलिया आणि मनसुख हिरेण प्रकरणाशी असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर त्यांचे शिवसेनेशी असलेले संबंध सुद्धा समोर आले होते.

आता वाझेंनंतर प्रदीप शर्मांचं नाव या प्रकरणात समोर आलं, त्याचाही शिवसेनेशी संबंध येतो. याच प्रकरणामध्ये अनिल देशमुखांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रत्येकाचा संबंध राज्यातल्या राज्यकर्त्या पक्षाशी येतो. एनआयए चढत असलेल्या एक-एक पायरीवरुन आणि या सर्वांचा शिवसेनेशी असलेला संबंध बघता हे प्रकरण कुठेतरी 'मातोश्रीशी' संबंधीत आहे का? हे पहाणं आवश्यक आहे. हा तपास त्या अर्थाने चालला असेल तर राज्यातल्या राजकारणाची एकुणच दिशा बदलणार, हे सुर्यप्रकाशाईतकं स्पष्ट आहे. जर एनआयए या स्परुपाचा गौप्यस्फोट करणार असेल आणि यामध्ये सहभागी सगळी माणसं बाहेर पडणार असतील तर मात्र राज्याच्या राजकारणाला एका वेगळ्या बदलाला सामोरं जावं लागेल.

यातली सगळी प्रकरणं आपल्याला वेगवेगळी बघता येणार नाहीत. या प्रत्येक प्रकरणाची कडी कुठेतरी एकमेकांना जोडलेली आहे. म्हणजेच बदल्यांच्या प्रकरणात जेव्हा सुरुवातीला गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलीसांच्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर या बदल्यांच्या प्रकरणात काय महाभारत घडलं हे आपण पाहिलं आहे. लक्ष्मी शुक्लांचा अहवाल त्याच आधारावरचा आहे. त्यामुळे हे प्रकरण, वाझेला खंडणी गोळा करायला लावण्याचं प्रकरण,मुंबईतल्या बारकडून पैसे गोळा करण्याचं प्रकरण, अँटिलिया प्रकरण जे पैशांशीच संबंधीत होतं असं म्हटलं जातं, त्यानंतर अँटिलिया प्रकरणातील सत्य बाहेर येईल म्हणुन घडलेलं मनसुख हिरेणचं प्रकरण आणि या प्रकरणामध्ये सहभागी असलेले आजीमाजी पोलीस अधिकारी या सगळ्याचा संबंध जोडला तर राजकीय पक्षाशी हि सगळी प्रकरणं संबंधीत असल्याचं स्पष्ट होईल. म्हणुनच प्रदीप शर्मांची चौकशी हि या एकुण प्रकरणातली पुढची पायरी ठरेल ज्यामुळे कदाचित यामागचा 'मास्टरमाईंड' समोर येईल. एनआयए खरोखर या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचतं, की केवळ खालचे मासे मारुन शांत बसतं, हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत यासंदर्भात होणा-या प्रत्येक हालचालिंवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.