लातुर : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने १५ मार्च ते पुढील आदेश मिळेपर्यत जिल्ह्यातील मनपा व नगरपालिका क्षेत्रात रात्र संचारबंदी लागु करण्यात आली आहे. रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यत ही रात्र संचारबंदी असणार आहे. यामध्ये जीवनावश्यक सेवा चालु असणार आहे.
यावर असणार आहेत निर्बंध
१) जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार ३१ मार्च पर्यत बंद.
२) पुर्व नियोजित परिक्षार्थीना कुठल्याही निर्बध राहणार नाहीत.
३) धार्मिक विधींमध्ये ५ व्यक्ती पेक्षा अधिक व्यक्तींना उपश्थित राहण्यास परवागी असणार नाही.
४) धार्मिक स्थळे या ठिकाणी नो मास्क नो एन्टी.
५) सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यत मनाई.
६)पुर्व नियोजित लग्न व त्या अनुषंगिक सभांरभ ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडावे.
७)जिम, मैदाने, स्विमिंग पूल, ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवावे.
#लातूर: जिल्ह्यात सोमवार दिनांक 15 मार्च 2021 पासून खालील आदेश देण्यात येत आहेत. कोरोना प्रतिबंधसाठी हे आदेश असल्याने सर्व नागरिकांनी आदेशाचे पालन करावे. घाबरून जाऊ नये,काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. pic.twitter.com/iDho7VzqMb
— Prithviraj B. P. (IAS),Collector & DM Latur (@LaturDm) March 14, 2021