निलंगा ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांना धक्का

निलंग्यातील मोठ्या ग्रामपंचायतीवर कॉग्रेसचे वर्चस्व

निलंगा ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांना धक्का

माधव पिटले/ निलंगा : तालुक्यातील एकूण ४८ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.त्यापैकी ४ बिनविरोध आणि ४४ ग्रामपंचायतीत निवडणूक पार पडली. या निवडणूकीत मतदारांनी स्थानिक नेत्यांना नाकारत संमिश्र प्रतिसाद दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.भाजप आ.अभिमन्यु पवार यांना कासारशिरशी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.तर माजी ज़ि.प.अध्यक्ष मिलिंद लातूरे यांच्या पत्नी संतोषीबाई लातूरे यांचा निलंग्यातील बालकुंदा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला आहे.या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

भाजपचे निलंगा तालुका अध्यक्ष शाहूराज थेटे यांचे तगरखेडा येथील पॅनलचा पराभव झाला आहे. तर होसूर येथील भाजपा जिल्हा संघटक तानाजी बिरादार यांच्या पॅनललाही लोकांनी नाकारत संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रमोद कदम यांना विजयी झाला केले. हासुरी जि.प.गटाच्या विद्यमान सदस्या अरूणा बरमदे यांच्या पॕनलचा ही पराभव झाला आहे.

तर भाजपाचे जेष्ठ नेते सावरी येथील कुमार पाटील व भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष अमीर पटेल यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत दोन उमेदवारांना समान मते पडल्याने निवडणूक आयोगाच्या कलम ३४ नुसार दोघांच्याही नावच्या चिठ्ठ्या टाकून तहसीलदार गणेश जाधव यांनी निकाल दिला. तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. तर काहीचे निकाल बाकी आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.