निलंगा - विजय देशमुख
ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत उत्तर प्रदेशातून आलेल्या व्यक्तीला गावक-यांनी आपल्या शेतात विलगीकरणात राहण्याचा सल्ला न पटल्याने चक्क गावक-यांवर हल्ला करत दोघांचा खुन तर तिघांना जखमी केल्याची घटना निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे घडली.
बोळेेगाव या गावातील तरूण विद्यमान बरमदे याचा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. शनीवारी तो बरमदे हा आपला ट्रक घेऊन उत्तर प्रदेशातून थेट आपल्या गावात आला. गावात येताच तंटामुक्ती समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी त्याला गावात न येता स्वतःच्या शेतात कोरोंटाईन राहण्याचा सल्ला दिला. व गावात येण्यास मज्जाव केला. पण बरमदे आणि त्याच्या नातेवाकांना हा सल्ला आवडला नाही उलट याचा राग आला.
आणि त्यांनी मज्जाव कररणा-या व्यक्तींवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
गावाशेजारील चांदोरी येथे जाऊन त्यांने आपल्या बहिणीच्या नातेवाईकांना बोलावून घेतले.अविनाश माने,गणेश माने,दत्तू माने,सचिन सोळंके, नितीन सोळंके, भरत सोळंके आणि विद्यमान बरमदे यांनी ग्रामस्थावर हल्ला चढवला शत्रुघ्न पाटील यांच्या घरावर दगडफेक केली.त्यासोबत चाकू हल्ला देखील कररायला सुरूवात केली. यात शत्रुघ्न पाटील यांचे वडील शहाजी किसन पाटील हे जागीच ठार झाले.
भरत सोळंके यांने केलेल्या चाकुच्या वारामुळे वैभव बालाजी पाटील हे ठार झाले. तर या हल्यात अन्य तीन जण जखमी झाले आहेत.घटनेची नोंद कासारशिरसी पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीसांनी आरोपीना अटक केली आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत
स्थलांतरीताने घेतला गावक-याचा बळी
कोरोंटाईन राहण्याच्या सल्ला दिल्याने राग आल्याच्या कारणावरून निलंगा तालुक्यातील बोळेगावात दोन जणांची हत्या तर तीन जण जखमी झाले आहेत.

Loading...