निलंग्यातील ते बारा आणि बाराशे प्रश्न

1 min read

निलंग्यातील ते बारा आणि बाराशे प्रश्न

एका तहसिलदाराचे पत्र आणि हजारो किलोमिटरचा प्रवास, अनेकांशी संपर्क प्रत्येक ठिकाणी हे मुस्लीम पर्यटक सुटले कसे. निलंग्यातील मशीदीत आसरा कोण दिला. कोणाचा राजकीय दबाव

लातूरकरांच्या आनंद व समाधानावर विरजण टाकणारी बातमी अखेर येऊन थडकली. काल ज्या २० जणांचे स्वैब नमूने पुण्यास तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात परप्रांतातून आलेल्या 'त्या' १२ जणांच्या वैद्यकीय अहवालाचा समावेश आहे व त्या १२ पैकी ८ जणांचे स्वैब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही बातमी लातूरकरांच्या मनात भीती निर्माण करणारी आहे. बातमी प्रसिद्ध होताच एकच गहजब उडाला आहे. सगळीकडे याबाबत चर्चा होताना दिसत आहे.

जगभर खळबळ उडवून देणाऱ्या कोरोना संसर्गजन्य आजारापासून आजपर्यंत लातूर सुरक्षित होते, ही त्यातल्या त्यात समाधान आणि आनंदाची बाब होती. मात्र, परप्रांतीय लोकांमुळे आज ह्या आनंदावर विरजण पडले आहे. आंध्र प्रदेशातील मूळ रहिवासी असलेले काही लोक हरियाणा येथे जमातच्या कार्यक्रमासाठी गेले होते व लॉकडाऊन व संचारबंदीमुळे ते तिकडेच अडकले होते. प्रवासाला सुरुवात होण्यापुर्वीच लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झाला.

अशाही परिस्थितीत ते '१२' जण हरियाणातील फिरोजपूर झिरका या गावाहून तेलंगणातील नंदियालकडे निघाले. तेही एका तहसीलदाराचे पत्र घेऊन. तहसीलदाराच्या पत्राला इतके महत्व कसे काय दिले गेले की लातूरपर्यंत विनासायास पोहचले? तहसीलदाराने दिलेल्या पासवर खासगी गाडीतून मथुरा, आग्रा, इंदौर, भोपाळ, बुरहाणपूर, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हे ओलांडून ते लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे आले. म्हणजे हरियाणातून महाराष्ट्रात येईपर्यन्त ज्या राज्यांच्या व जिल्ह्यांच्या सीमा 'त्या' १२ जणांनी ओलांडल्या, त्यात कुठेही त्यांना रोखण्यात कसे काय आले नाही?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास सर्वच राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे, तर जिल्ह्यांच्याही सीमा सीलबंद आहेत. मग ज्या-ज्या ठिकाणी त्याची तपासणी झाली, तेथे त्यांनी हरियाणातील तहसीलदार यांचा पास दाखवला तो कसा मान्य झाला ? की यांची कुठल्याही सीमेवर अडवणुक वा तपासणी झाली नाही?

उस्मानाबाद तहसीलदाराने त्यांना लातूरच्या सीमेच्या आतपर्यंत आणून सोडले कसे ? कोणत्या निकषावर? कोणाच्या सांगण्यावरुन किंवा आदेशावरुन? तहसीलदाराला असे सोडण्याचे अधिकार असतील काय?

महाराष्ट्रात प्रवेश करताच त्यांना जेथे आहेत तेथेच विलगीकरण रुग्णालयत का हलविण्यात आले नाही ? जळगाव, धुळे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद इथंही त्यांची तपासणी वा चौकशी झाली असेल का? हरियाणातल्या 'त्या' तहसीलदाराच्या साध्या पासला इतकं वजन कसं काय प्राप्त झालं?

बरं, निलंगा इथं ते ज्या प्रार्थना स्थळात (स्पष्टच लिहायचे तर मशीदीत) थांबले, तेव्हाही तेथे स्थानिक वा जिल्हा प्रशासनास माहिती न देता त्यांना आसरा देणारे कोण आहेत? त्यांची पार्श्वभूमि काय आहे? कोणीही आणि कुठूनही आले की आसरा दिला जातो काय? यापूर्वीही आणखी कोणाकोणाला तिथं किंवा जिल्ह्यात कुठंही कोणी अशा संशयीतांना आसरा दिला होता काय? असे प्रश्न निर्माण होतात.

काल ते सगळे कोरोना निगेटिव्ह आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनास कसे काय कळवले? सदरील लोकांमध्ये कसल्याही आजाराची लक्षणे आढळून आली नाहीत, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने लेखी कळवले, ते कसल्या तपासणीच्या आधारे? त्यांना आयसोलेशन गरज नाही, अशी शिफारस सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी का करावीशी वाटली? किरकोळ प्रकारच्या तपासणीच्या आधारे 'त्या' १२ जणांना क्लीनचिट का देण्यात आली असेल? कोणाचा दबाव होता का?

IMG-20200404-WA0026

स्वैब नमुने घेतले होते, तर त्याचा अहवाल प्राप्त होण्यापुर्वीच ते निगेटिव्ह असल्याचे जाहीर करून आयसोलेशन आवश्यक नाही असे लेखी कळवण्याच्या निलंगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उद्देश काय असेल?निलंगा येथे राहण्यासाठी कोणी राजकीय दबाव आणला होता का?

सर्व लॉकडाऊन असताना त्यांनी खासगी गाडीतून एवढा लांबचा, साधारणतः दीड हजार किलोमीटर अन्तराचा प्रवास केला कसा? त्यांच्या जेवण, खाण्या-पिण्याची सोय कुठे-कुठे आणि कोणी केली? या दीर्घ प्रवासात त्यांच्या संपर्कात किती जण आले असतील?

निलंगा येथे त्यांच्या संपर्कात कोण कोण आले? त्यांना तिथे थांबु देण्यासाठी जे मध्यस्थ म्हणून पुढे आले, त्यांची तपासणी करणार का? ज्या वाहनातून व पोलिसांच्या निगरानीखाली त्या १२ जणांना निलंग्याहून लातूरला आणले गेले, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी कशा प्रकारे घेतली गेली होती? पुरेसे मास्कस, पीपीई किट्स उपलब्ध आहेत काय?

ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्या बारा जणांनी असे अनेकानेक प्रश्न निर्माण केले आहेत. उत्तरे कोण देणार किंवा शोधणार....? हाही एक भला मोठा प्रश्नच आहे...! गोपनीयतेच्या नावाखाली त्यांची नावे उजागर करता येणार नाहीत, त्यामुळे ते लोक कोण ते लोकांना कळणार नाही आणि त्यामुळे ह्या चालत्या फिरत्या 'मानवी बॉम्ब'पासून सावधानताही बाळगता येणार नाही. काय वाढून ठेवलंय लातूरकरांच्या भविष्यात, ते येणारा कालच दाखवून देईल...!

  • विजयकुमार स्वामी