निष्क्रिय सरपंचांना पायउतार करून शासकीय प्रशासक निवडा

1 min read

निष्क्रिय सरपंचांना पायउतार करून शासकीय प्रशासक निवडा

युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांचे निवेदन

सिद्धेश्वर गिरी /सोनपेठ : सरपंच निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून गावपातळीवरील पुढाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता जिल्ह्यातील नेत्यांना हाताशी धरून लगाबाजी चालवली आहे.या सर्व प्रकियेत  कालच सरपंच निवड प्रक्रिया  पालकमंत्र्यांच्या शिफारशीने होणार हे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.या अनुषंगाने ज्यांची शिफारस तो सरपंच असा अभाव भविष्यात निर्माण होऊन गावातील गावपुढारी सरपंच होणार असल्याचे कळते आहे. मात्र या सर्व प्रक्रिया राबवताना ज्या गावातील निष्क्रिय सरपंच आहेत त्यांना पायउतार करून त्या गावात शासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून निवड करण्याची मागणी नुकतीच युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,सोनपेठ तालुका म्हणजे गोदाकाठी असणारा तालुका  शासन निर्णयानुसार सरपंच हा ग्रामसमितीप्रमुख असतो. त्यामुळे गावातील प्रत्येक कारभारावर लक्ष घालण्याबरोबरच गावातील विकासकामे करताना कार्यशील आणि निष्ठापूर्वक कामे करणारा  सरपंच गावासाठी असावा  लागतो.मात्र सध्या सर्वत्र टक्केवारीचे बस्तान आणि त्यातून निर्माण होणारा विकासाचा फज्जा यामुळे काही गावात विकासकामे होत नसल्याचे दिसून येते या सर्व प्रकाराची पाहणी करून या गावातील निष्क्रिय सरपंचांना पाय उतार करत याठिकाणी शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून नेमावा यामुळे गावातील गावपातळीवर उद्भवणारे तंटे होणार नाहीत आणि गावाचा विकास होण्यास मदत होईल असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदर निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री नवाब मलिक यांना देण्यात आल्याचे कळते.