अवैद्य देशी विक्रीवर निटूर पोलिसांची रेड

निटूर उजेड रोडवर अवैद्य देशी विक्रीवर निटूर पोलिसांची रेड,पन्नास हजार सातशे वीस रूपयाचा मुद्देमाल जप्त , दोन आरोपी अटकेत

अवैद्य देशी विक्रीवर निटूर पोलिसांची रेड

विजय देशमुख/निटूर: निटूर व परीसरामध्ये अवैद्य धंदेवाल्यावर पोलिस ब-याच दिवसापासून कारवाई करत आहेत, मात्र अजून कांही जण चोरी छुपे अवैद्य विदेशी दारू ची वाहतूक व विक्री करत आहेत. त्यामुळे निटूर उजेड रोडवर अवैद्य विदेशी विक्री करताना व जवळ बाळगताना ची माहीती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिस उपनिरीक्षक मलय्या स्वामी व पो काॕ विठ्ठल साठे यांनी रेड मारली.यामध्ये दुचाकी गाडीसह पन्नास हजार सातशे वीस रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली.

सध्या सर्वत्र कडक लाॕक डाऊन आहे. त्यामुळे जामावबंदी चा ही आदेश आहे. मात्र काही महाभाग अजूनही अवैद्यपणे विदेशी दारू ची विक्री व वाहतूक करत आहेत असेच निटूर उजेड रोडवर हा प्रकार चालू असल्याची याची माहीती मिळाल्यावर निटूर पोलिस चौकी चे उपनिरीक्षक मलय्या स्वामी व पो काॕ साठे यांनी तात्काळ छापा मारून एक दुचाकी गाडी सह एकशे बत्तीस विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेतले.
व जमावबंदी व कोविड 19 या आजाराचे संसर्ग होईल असे कृत्य केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.