यावर्षी कर्णपुऱ्याची यात्रा नाहीच..

1 min read

यावर्षी कर्णपुऱ्याची यात्रा नाहीच..

कोरोनाचे संकट अजूनही कायम - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

सुमित दंडुके/औरंगाबाद: कर्णपुरा येथे नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यात्रा भरणार नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत त्या अनुषंगाने कोरोना संसर्ग वाढीला कुठेही चालना मिळेल असे उपक्रम जसे की गरबा, दांडिया नवरात्र उत्सवात होणार नाही. त्यामुळे यात्रा देखील होणार नाही.
कर्णपुऱ्यातील तुळजाभवानी मंदिर हे शहर व जिल्ह्याचे ग्रामदैवत आहे. यात्रेनिमीत्त लाखो भाविक या ठिकाणी येतात. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल यातून होत असते. मात्र यावर्षी खबरदारी म्हणून यात्रा होणार नाही. मात्र पुजा व इतर सर्व विधी घटस्थापनेपासून शेवटपर्यन्त योग्य ती खबरदारी घेऊन होतील.