'ना ये भोंकते है और नाही ये घुर्रते है, बस कांटते है', नवा सिनेमा 'कुत्ते' ची घोषणा

अर्जुन कपूरने आपल्या "कुत्ते या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

'ना ये भोंकते है और नाही ये घुर्रते है, बस कांटते है', नवा सिनेमा 'कुत्ते' ची घोषणा

मुंबईः अर्जुन कपूरने आपल्या 'कुत्ते' या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. आसमान भारद्वाजच्या डायरेक्शनमध्ये तयार होणारा हा पहिलाच सिनेमा आहे.

या चित्रपटाची पहिली झलक अर्जुन कपूरने सोशल मीडियावर दाखवली आहे. कुत्र्यांचे मुखवटे घातलेल्या 7 व्यक्ती ओळीने उभ्या असलेले या फर्स्ट लूकमध्ये दिसते आहे.'ना ये भोंकते है और नाही ये गुर्रते है, बस कांटते है' असे अर्जुन कपूरने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या चित्रपटात अर्जुन कपूरच्या बरोबर कोंकणा सेन शर्मा, नसिरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे लीड रोलमध्ये दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू आहे.

gffghfh-5

यावर्षाच्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. विशाल भारद्वाज आणि लव्ह रंजन हे दाघेही मिळून हा चित्रपट बनवत आहेत. आसमान भारद्वाज या चित्रपटाचे डायरेक्शन करणार आहे.त्याने वडील विशाल भारद्वाज यांना " 7 खून माफ, मटरू की बिजली का मंडोला' आणि "पटाखा' या चित्रपटासाठी सहायक म्हणून काम केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या झलकवरून तरी हा चित्रपट एक कॉमेडी असणार आहे, असा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो.

चित्रपटाविषयी बोलताना भूषण कुमार म्हणाले, “आसमानचे दिग्दर्शन असणारा पहिला चित्रपट ‘कुत्ते’ साठी विशालजी आणि लव यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद झाला आहे. दोन अतिशय वैविध्यपूर्ण चित्रपट निर्मात्यांचा हा सर्जनशील समन्वय पाहणे रोमांचक असणार आहे. कुत्तेची कथा आणि स्टार कास्ट दोन्ही खूपच खास आहेत. लव फिल्मस आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज यांनी ‘कुत्ते’ ची निर्मिती केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.