आताची वेळ ही  पंचनामे करत बसण्याची नाही-अनिल बोंडे

1 min read

आताची वेळ ही पंचनामे करत बसण्याची नाही-अनिल बोंडे

महाविकास आघाडी सरकारने पंचनामे न करता एकरी ५०,००० रुपये मदत द्यावी, अशी मागणी माजी कृषी मंत्री तथा भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केली.

लातूर : आताची वेळ ही पंचनामे करत बसण्याची वेळ नाही. महाविकास आघाडी सरकारने पंचनामे न करता एकरी ५०,००० रुपये मदत द्यावी, अशी मागणी माजी कृषी मंत्री तथा भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केली.

माजी मंत्री अनिल बोंडे यांनी नव्या कृषी विधेयकासह जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पत्रपरिषदेत बोलताना दिली. माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हेही यावेळी उपस्थित होते.

अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेले आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे वेळघालवु पंचनामे
करण्याचे सोपस्कार करू नयेत. पंचनामे न करता सरळ शेतकऱ्यांना तातडीने एकरी ५०,००० रुपये मदत द्यावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत केली. शेतकऱ्यांना मदतीची आमची मागणी तात्काळ पूर्ण केल्यास सरकारच्या स्थानिक प्रतिनिधींचा आम्ही जाहीर सत्कार करू, असे बोंडे म्हणाले.

याप्रसंगी बीड जिल्हा अध्यक्ष रमेश पोफळे, प्रवक्ता गणेश हाके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, भाजप लातूर जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष साहेबराव मुळे आदींची उपस्थिती होती.