अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार नाही-निवडणुक आयोग

काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार देण्याची प्रक्रिया पुढे ढकलली आहे...

अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार नाही-निवडणुक आयोग

निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी सारख्या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. यासंदर्भात निवडणुक आयोगाने शुक्रवारी घोषणा केली आहे. कोरोनाच्या काळात या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीत उमेदवाराला केवळ ५ लोकांसोबत घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मतदानाचा कालावधी १ तासाने वाढवण्यात आला आहे. तसेच सर्व मतदान बुथवर साॅनिटायजर, मास्क, सोप वॉटर, वेटिंग ऐरिया आदिंची व्यवस्था करण्यात येणार आहे. यापूर्वी बिहारमध्ये निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या आहेत.

अनिवासी भारतीयांना भारतातील निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी अजून काही काळ वाट पहावी लागेल. पाच राज्यांच्या येत्या विधानसभा निवडणुकीत अनिवासी भारतीयांना मतदान करता येणार नाही. असे केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनिल अरोरा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. या आधी नोव्हेंबरमध्ये कायदा मंत्रालयाला लिहीलेल्या एका पत्रात निवडणूक आयोगाने अनिवासी भारतीयांना बॅलेट पेपरच्या सहाय्याने मतदान करता येईल, त्याची सर्व तयारी झाली आहे. असे कळवण्यात आले होते. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार देण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.