नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांनी गावच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे : माजी मंत्री. लोणीकर

मतदार संघातील ७८ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांनी गावच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे : माजी मंत्री. लोणीकर

सुरेश शिंदे / परतुर : ग्रामपंचायत चा सरपंच हा त्या गावच्या विकासाचा आरसा असून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या विकासासाठी स्वताला झोकून देऊन काम करावी असे आवाहन माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी केले. ते परतुर येथे संपन्न झालेल्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनलाल शिंगी, मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे , भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश राव निरवळ, जालना तालुका अध्यक्ष प्रकाश टकले, विलासआकात, परतूर पंचायत समितीचे सभापती रंगनाथ येवले, उपसभापती रामप्रसाद थोरात, जिल्हा परिषद सदस्य पंजाब राजेश मोरे, अंकुशराव बोबडे माऊली शेजुळ बद्रीनारायण खवणे बद्रीनारायण ढवळे बोराडे कैलास बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी मंत्री लोणीकर म्हणाले की, मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी वर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी सरपंच उपसरपंच त्याबरोबरच आपल्या सर्वांचे असल्याची ते म्हणाले परतूर विधानसभा मतदार संघामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण मंत्री असताना ६ हजार ७००कोटी रुपयांची विकासकामे केली. त्याचा परिणाम म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने सव्वा लाखापेक्षा जास्त मतदान करून मला निवडून दिले त्याच शिदोरीवर मतदार संघातील शंभर पैकी ७८ ग्रामपंचायती जनतेने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिले असल्याचे लोणीकर यांनी यावेळी सांगितले जनसामान्य माणसाच्या विकासासाठी गेल्या ३५ वर्षापासून आपण सदैव अवकात कार्यरत असून येणाऱ्या काळात ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.