ओबीसी नेते करणार मराठा आरक्षणाला सहकार्य संभाजीराजेंना दिला शब्द.

1 min read

ओबीसी नेते करणार मराठा आरक्षणाला सहकार्य संभाजीराजेंना दिला शब्द.

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल,” असा शब्द ओबीसी समाजातील नेत्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना दिला.

मुंबई : मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष वाढू नये. यासाठी माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली. मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, असा शब्द ओबीसी समाजातील नेत्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेतले. शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले. माझी पहिल्या दिवशी पासून हिच भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेऊन सोडवला जावा अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे.ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली याचा मला आनंद झाला आहे. अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली.

ओबीसी आणि मराठा समाजातील लोकांनी एकत्र येत यावर मार्ग कसा काढता येईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावा. तसेच सकल मराठा समाजाच्या लोकांसोबत मी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांना भेटणार आहे. त्यावेळी ओबीसी समाजातील लोकांना सोबत घेऊन मार्ग काढण्याबाबत मार्ग सुचवणार आहे, असेही संभाजीराजेंनी सांगितले.