ओबीसी आरक्षण; भाजपचे चक्काजाम आंदोलन

ओबीसी आरक्षणावरुन भाजप आक्रमक...

ओबीसी आरक्षण; भाजपचे चक्काजाम आंदोलन

औरंगाबाद: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक झाल्याचे चित्र आज दिसले. शहरातील अमरप्रीत चौकात आज सकाळी भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शहरअध्यक्ष संजय केनेकर यांच्या मार्गदर्शनात पार पडले, यावेळी आ.अतुल सावे, प्रमोद राठोड, प्रवीण घुगे, बसवराज मंगरुळे, गोविंद केंद्रे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महाराष्ट्रात ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्य सरकारला निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार नाही, तो निवडणूक आयोगाला आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी राज्यात विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.
------1
औरंगाबादेत आज विविध तालुक्यांमध्ये भाजपची तीव्र आंदोलने होत आहेत. शहरात केंब्रिज चौक, वाळूजमध्ये बजाजनगर, ओअॅसिस चौक, खुलताबाद, पैठण तहसील कार्यालय आदी महत्त्वाच्या ठिकाणी भाजपचे हे आंदोलन पार पडले आहे. यावेळी सरकार हमसें डरती है, पोलिस को आगे करती है, ओबीसी के सम्मान मे, भाजप मैदान मे. अशा घोषणा देण्यात आल्या. अमरप्रीत चौकात भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यामुळे काही काळ मुख्य रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. कार्यकर्त्यांना अडविताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यानंतर पोलीसांनी बळाचा वापर करीत पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
--------
---------1
शहराध्यक्ष संजय केनेकर म्हणाले...
महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे आरक्षण आघाडी सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे रद्द झालेले आहे. आघाडी सरकार हे ओबीसीच्या मुळावर उठलेले आहे. हे फक्त भाषण करतात व ओबीसीं चा वापर करून घेतात. समाजाला शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव आघाडी सरकारचा आहे. तरी सरकारने त्वरित मागास आयोग न नेमल्यामुळे, न्यायालयासमोर ठोस भक्कम बाजू न मांडल्यामुळे ओबीसीला मिळालेले आरक्षण रद्द झाले. हे आघाडी सरकारला आलेले अपयश आहे. आणि ते सरकारने मान्य करायला हवं, आरक्षण मिळवून देऊ न शकणाऱ्या सरकारने तात्काळ राजीनामे द्यावे, अन्यथा आम्ही यापुढेही आणखी तीव्र आंदोलन करु.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.