शासनाच्या नियमाला अधिकाऱ्यांचे हारताळ

स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना मास्क,सॅनिटायझरचे वाटपच नाही

शासनाच्या नियमाला अधिकाऱ्यांचे हारताळ

विजय कुलकर्णी/परभणी: परभणीतील १५ उपकेंद्रांवर रविवार, २१ रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ३ हजार ९०७ पैकी २ हजार ८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कोविडच्या नियमानुसार ही परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु काही परीक्षा केंद्रांवर मास्क आणि सॅनिटायझरचे वाटपच करण्यात आले नाही. यामुळे शासनाने घालून दिलेल्या कोविडच्या नियमांना अधिकाऱ्यांनीच हारताळ फासल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशाप्रमाणे १५ उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ज्ञानोपासक महाविद्यालय, रावसाहेब जामकर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, कमलताई जामकर महिला महाविद्यालय, शारदा महाविद्यालय, संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजी इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅड मॅनेजमेंट स्टडी, सारंगस्वामी विद्यालय, मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्यामंदिर, शिवाजी महाविद्यालय, शिवाजी पॉलिटेक्निक इंन्स्टीट्युट, बालविद्यामंदिर हायस्कुल, जि.प. कन्या प्रशाला, मराठवाडा हायस्कुल, वसंतराव नाईक माध्य. व उच्च माध्य. विद्यालय या केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. या १५ केंद्रांवरील १६३ खोल्या १५ उपकेंद्रप्रमुख, ६२ पर्यवेक्षक, १७८ समवेक्षक, १८ सहाय्यक कर्मचारी व ३० शिपाई असा लवाजमा या परीक्षेत अधिकाऱ्यांचा होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून परभणी शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच राज्यसेवा परीक्षा रद्द केली होती. परंतु विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर रविवार, २१ रोजी ही परीक्षा घेण्यात आली. शासनाने या परीक्षेसाठी काही नियम घालून दिले होते. त्यानुसार सोशल डिस्टंन्सींग, मास्क, सॅनिटायझरचे वाटप परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात येणार होते. परंतु काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी दिलेच नाहीत. त्यामुळे शासनाच्या नियमांना अधिकाऱ्यांनीच हारताळ फासल्याचे दिसून आले. मात्र यामधून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास याला जबाबदार कोण? असा सवालही आता विचारला जात आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.