ओळखीच्यानीच केला बहिण- भावाचा निर्घून खून

1 min read

ओळखीच्यानीच केला बहिण- भावाचा निर्घून खून

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील बीड बायपासवरील एमआयटी चौक परिसरात राहणा-या बहिण भावाची गळा चिरून निर्घून हत्या करण्यात आली.किरण लालचंद खंदाडे(18) व तिचा भाऊ सौरभ लालचंद खंदाडे (16) अशी हत्या झालेल्या बहीण- भावांची नावे आहेत. सौरभ हा पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीत शिकत होता तर किरण ही पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत होती.
आई-वडील शेतीच्या कामासाठी गावाकडे गेले असता घडली घटना
किरण व सोरभचे आई-वडील जालना जिल्ह्यामधील पाचनवडगाव येथे शेती करतात. शेतीसाठी औरंगाबाद शहरातून ये-जा करतात, बीड बायपास परिसरात एमआयटी चौक येथे दोन मजली पाच खोल्यांचा बंगला भाड्याने घेऊन खंदाडे कुटुंब राहते.
खंदाडे दांपत्य आपल्या मोठ्या मुलीला सोबत घेऊन दि.(9) नेहमीप्रमाने शेतात गेले.संध्याकाळी 8 वाजता घरी परतले असता त्यांना घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात किरणव सोरभ आढून आले.घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या ठिकाणी चोरीदेखील झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आरोपी ओळखाचे असल्याचा संशय
खंदाडे यांच्या घराचे लाकडी व लोखंडी असे दोन्ही दरवाजे उघडेच होते. तसेच घरात टेबलवर चहाचे चार कपही पोलिसांना दिसून आले.याचाच अर्थ कोणीतरी ओळखीचे दोन व्यक्ती घरात आल्या असाव्यात यातूनच दोघा बहिण-भावाचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे.