चाकूरकर यांच्या वाढदिवस निमित्ताने 'ग्रीन लातूर वृक्ष टीम'ने केले ८५ झाडांचे रोपण...

1 min read

चाकूरकर यांच्या वाढदिवस निमित्ताने 'ग्रीन लातूर वृक्ष टीम'ने केले ८५ झाडांचे रोपण...

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ८५ व्या वाढदिवस निमित्ताने ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने आयटीआय महाविद्यालयामध्ये पर्यावरण पुरक पारसपिंपळची झाडे लावून शुभेच्छा देण्यात आल्या.

लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ८५ व्या वाढदिवस निमित्ताने
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने आयटीआय महाविद्यालयामध्ये पर्यावरण पुरक पारसपिंपळची झाडे लावून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी लोखंडे सामाजिक कार्यकर्ते सोनु डगवाले, दिशा प्रतिष्ठानच्या ॲड. वैशाली लोंढे यादव उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, इम्रान सय्यद, गंगाधर पवार, पुजा निचळे, शैलेश सुर्यवंशी प्रफुल्ल भोसले, सिताराम कंजे, महेश भोकरे, खंडेराव गंगणे, वंजारे कृष्णा, पुरुषोत्तम नावंदर, स्नेहा गावंडे, गुलाब पाटील, रामेश्वर पाटील, विशाल बिरादार यांनी गवत काढणे, जागा स्वच्छ करणे, झाडे लावणे, माती भरणे, काठ्या लावणे, पाणी देणे याकरीता परिश्रम घेतले.