दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची झळ

दिवाळीआधी महागाईचा मोठा झटका.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची झळ

नवी दिल्ली : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्ब फुटला आहे. १ नोव्हेंबरपासुन पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली. त्यामुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १७३६.५ रुपयांवरुन २०००.५ रुपये इतकी झाली आहे.

दिल्लीत आता विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ९२६ रुपये, मुंबईत ८९९.५० रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत आता ९१५.५० रुपये आहे.

घरगुती गॅस सिलेंडर दर स्थिर -
महत्त्वाची बाब म्हणजे तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या १४.२ किलोग्रॅम विना सब्सिडी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत १४.२ किलोग्रॅम विना सब्सिडी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये इतकी आहे.

ऑक्टोबर महिन्यात घरगुती गॅस दरात १५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. याआधी सप्टेंबर महिन्यात घरगुती LPG Gas Cylinder च्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोलियम कंपन्यानी १८ ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.