सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: सोनपेठ तालुक्यातील परळी गंगाखेड रोडवर निळा पाटीजवळ अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना नुकतीच घडली असून. याबाबत अधिक माहिती अशी की, १६ सप्टेंबर रोजी हिंगोली येथून परळी येथील खिजर खान हे त्यांच्या सहकाऱ्यांसह इंडिगो गाडी क्र.एम.एच.२५ ए.२५५० ने परळी येथे जातत असताना समोरून येणाऱ्या स्कार्पिओ गाडी क्र. एम.एच.२२यु.७५७७ गाडीने भरधाव वेगात येऊन धडक दिल्याने या अपघातात खिजर खान यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर शेख आंसर,शेख सलीम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. दोघांनाही पुढील उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पुढील तपास सोनपेठ पोलीस करत आहेत.
अपघातात एकाचा मृत्यु! तर दोघांची प्रकृती चिंताजनक.
सोनपेठ तालुक्यातील परळी गंगाखेड रोडवर निळा पाटीजवळ अपघात.

Loading...