झरी अंतर्गत उपकेंद्रात शंभरटक्के लसीकरण करणार-टाकसाळे

आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या सर्वेक्षणाच्या सूचना

झरी अंतर्गत उपकेंद्रात शंभरटक्के  लसीकरण करणार-टाकसाळे

परभणी: औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या परभणी तालुक्यातील झरी या गावातील प्रा.आ.केंद्रांतर्गत असलेल्या सर्व उपकेंद्रांमधील गावात कोव्हीडचे शंभर टक्के लसीकरण करून मराठवाड्यात प्रथम क्रमांक आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचा निर्धार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केला.

आज तालुक्यातील झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात साठ वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हीड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाकसाळे यांनी कोव्हीड लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना टाकसाळे म्हणाले, कोव्हीडच्या प्रादुर्भावापासून बचाव होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. सदर लस विश्वसनीय असून या बद्दल कोणीही शंका बाळगू नये.

तसेच गावातील आशाताई, अंगणवाडी सेविका, शिक्षक आरोग्य कर्मचारी यांनी गावात कुटुंबनिहाय सर्व्हे करून १००% लसीकरण करून झरीचे नाव मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याच्या सूचना टाकसाळे यांनी दिल्या. घरातील प्रमुख व्यक्तींनी जेष्ठ मंडळींचे तात्काळ लसीकरण करून घेण्याचे आवाहन शिवानंद टाकसाळे यांनी केले, तसेच सद्यपरिस्थितीत काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.

याप्रसंगी जि. प. सदस्य गजानन देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, शिक्षणाधिकारी डॉ. सूचिता पाटेकर, गटविकास अधिकारी अनुप पाटील, डॉ.राजीव सोनवणे, सरपंच दीपक देशमुख, उपसरपंच मठपती, ग्राम विकास अधिकारी आनंद खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा कुलकर्णी, डॉ. वर्षा कुलकर्णी, आरोग्य विभागाचे प्रसिद्धी प्रमुख सोमवंशी, स्वच्छ भारत मिशन कार्यालयातील अधिकारी, सर्व शिक्षक, आशाताई, अंगणवाडीताई, आरोग्य कर्मचारी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.