कार-ट्रकच्या भीषण अपघातात एक ठार

झिरोफाटा-पूर्णा मार्गावरील कात्नेश्वर जवळ वर्हाड घेऊन जात असलेल्या इनोव्हा कार व ट्रकची समोरासमोर धडक

कार-ट्रकच्या भीषण अपघातात एक ठार

परभणी: पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा-पूर्णा मार्गावरील कात्नेश्वर जवळ वर्हाड घेऊन जात असलेल्या इनोव्हा कार व ट्रकची समोरासमोर धडक झाली. ८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये गौर येथील किशन विठ्ठलराव पारवे (७०) यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाले.

सेलू येथून लग्न समारंभ उरकुन गौर येथील हे वर्हाड परत येत होते. इनोव्हा (क्र.एम.एच.२६-ए.के.९७०० तर ट्रक क्र. एम.एच.१०-ए-डब्लु ८१६१) या दोन्ही वाहनांमध्ये जोराची धडक झाली. मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा समोरच्या बाजुने चुराडा झाला आहे. या अपघातात चालक कालीदास केशव पारवे (२३) गंभीर जखमी आहे. कारमध्ये एकुण ७ जण होते. यामध्ये कोंडीराम विठ्ठल पारवे (६७), सुरेश धोंडीराम पारवे (३८), धोंडीराम नानाराव पारवे (५५), वैजनाथ रामराव पारवे (४५), प्रभाकर नारायण पारवे (४०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.