पोकरा कामगारांची निलंगेकर यांच्या एका फोनमुळे दिवाळी झाली गोड

अरविंद पाटील निलंगेकर यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मानले आभार

पोकरा कामगारांची निलंगेकर यांच्या एका फोनमुळे दिवाळी झाली गोड

निलंगा : येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख संजीवनी हा प्रकल्प गेली तीन वर्षांपासून राबवला जात आहे. त्याअंतर्गत कंत्राटी कर्मचारी म्हणून अनेक पोकरा अंतर्गत काम करत असतात. गेली चार महिन्यापासून त्यांचा मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने त्या कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळी च्या तोंडावर दिवाळी काळी होत होती.तसेच जेव्हा सर्व कर्मचाऱ्यांची पगारी होणार होते त्याच दिवशी महावितरण विभागाने लाईटचे कनेक्शन तोडल्याने जवळपास अनेक घरात दिवाळी विना पगारीमुळे अंधारात होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांना मिळताच क्षणाचा विलंब न करता महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता कसपटे यांना फोनद्वारे संबंधीत कंत्राटी कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात आणून देत तात्काळ विज कनेक्शन जोडण्याचे आदेश देताच रात्री सहा वाजता लाईट जोडणी केल्याने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन बँक खात्यात जमा होताच कर्मचाऱ्यांच्या चहऱ्यावर हस्य फुल्ले आणि सर्व नानाजी देशमुख कृषी संजीवनी मधील पोकरा प्रकल्पावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अन नेता असावं तर भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकरां सारखं असावं असे उदगार काढत कर्मचाऱ्यांनी आभार मानले.

लातूर जिल्ह्यातील कंञाटी कर्मचाऱ्यांचे सर्व संस्थानी वेळेत मानधन देऊन त्यांची दिवाळी साजरी करावी अन्यथा मला वेगळे पाऊल उचलून न्याय द्यावा लागेल असा इशारा भाजपा प्रदेश सरचिटनिस अरविंद पाटील निलंगेकर यानी माध्यमाशी बोलताना दिला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.